Ashish Shelar latest news
Ashish Shelar latest news sarkarnama
मुंबई

भाजपचा कोथळा काढायला निघालेले आता कुठल्या बिळात बसला आहात ? ; उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत ?

सरकारनामा ब्युरो

पुणे : देशविघातक कारवाया केल्याच्या संशयावरून एनआयए, ईडी (ed) आणि एटीएसच्या पथकाने संयुक्तपणे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) १२ राज्यांतील अनेक कार्यालयांवर गुरुवारी छापे टाकले.पुण्यातही एटीएस आणि एनआयएच्या (nia) पथकाने कारवाई करत कोंढव्यातून दोघांना अटक केली. (Ashish Shelar latest news)

याविरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकारावरुन राजकारण तापल आहे. भाजपावर टीका करणारे उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत ? असा सवाल करत भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

घोषणाबाजीवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.पुण्यात शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.भाजपाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शेलारांची याबाबत टि्वट केलं आहे.

पीएफआयचा देशविरोधी कट उघड झाला आहे. पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या, हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या, तसेच सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करणारे उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

इतिहासातील खानांची सदैव ‘उचकी’ लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले, संकटे टळून गेल्यावर ‘करून दाखवले’चे होर्डिंग लावणारे आता पीएफआयविरोधातील कारवाईचे समर्थनही करायला तयार नाहीत आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत. आता कुठल्या बिळात बसला आहात? असा सवालही शेलारांनी आपल्या टि्वटमध्ये विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT