मुंबई : भाजप नेते आणि देशाचे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याबरोबरच त्यांनी आपण शिवसेना (Shivsena) सोडल्यावर मारण्यासाठी देशाबाहेरच्या गॅंगस्टरला सुपरी देण्यात आली होती, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. (Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News)
ठाकरे यांनी आज दिलेल्या मुलाखतीवर राणे यांनी जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीत म्हणातात की माझीच माणसे विश्वासघातकी ठरली. मात्र तुम्ही बाळासाहेबांनंतर आतापर्यंत कुठला विश्वास कुठल्या शिवसैनिकांना दिला? संकटात असतांना कुठल्या आमदार खासदारांना मदत केली. 'मातोश्री' बाहेरील कुठल्यातरी व्यक्तीला आपण मदत केली आहे का? असा सवाल राणेंनी ठाकरेंना विचारला.
साधी भेट त्यांनी दिली नाही तर विश्नास आणि मदत तर दुरच आहे. आमदार आता सांगत आहेत की चार-चार वेळा भेट मागितली तरी मिळाली नाही आणि हे आता बोलत आहेत. ज्याला तुमचा विचार पटला नाही की त्याला गद्दार म्हणता. आज मी वृत्तपत्रात वाचलं की एकनाथ शिंदेंना मारायलाही नक्षलवाद्यांना सुपारी दिली होती. मात्र हा काही पहिला प्रयोग नाही. बाळासाहेबांनी तयार केलेली माणस मोठी व्हायला लागली की एकेकाला कमी करण्याच काम केलं गेलं, असा थेट आरोप राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
रमेश मोरे, जयेद्र जाधव यांची हत्या कोणी केली? तसेच ठाण्याचे एक नगरसेवक त्यांची हत्या कोण केली याचबरोबर मी जेव्हा २००५ ला शिवसेना सोडली तेव्हा कोणाला नाही सुपाऱ्या दिल्या. देशाबाहेरच्या अन् देशातीलही गॅंगस्टरलाही सुपरी दिल्या, सगळ्यांना दिल्या. मात्र मला याबाबत नाही बोलायचे. पण मी समर्थ होतो त्याला तोंड द्यायला तसेच माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे मी वाचलो. यामुळे यांनी तोंड उघडू नये, ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितले की, आम्हाला असे काम मिळाले आहे. आपण सावध रहा अन्यथा दुसरे करतील. त्यामुळे शिंदेची सुपारी ही काही पहिली गोष्ट नाही, असा गंभीर आरोप राणेंनी ठाकरेंवर केला.
राणेंनी नेहमीप्रमाणे ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यावर अनेक आरोप केले. ते म्हणाले, मुलाखती दरम्यान ते आपण फार सोशिक असल्याचा आणि दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, ते कसे आहेत, हे मला चांगले माहीत आहे. मी 34 वर्षे शिवसेनेत घालवली आहेत. त्यामुळे ठाकरेंचा नाटकीपणा मला चांगला माहीत आहे. ते दृष्ट व कपटी स्वभावाचे असून ते केवळ आपल्या आजारपणाचे भांडवल करण्याचा प्रयत्नात आहेत. याबरोबरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना आता बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व आठवले आहे. हिंदुत्वावर बोलताना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे नाही, असे सांगितले आहे. मात्र, बाळासाहेब हे आम्हाला वडिलांसमान होते. त्यांना अंडरवर्ल्डची धमकी मिळाली तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही होतो. तेव्हा तू कुठे होतास रे शेंबड्या? घरातून दोन वेळा बाहेर पळून गेला होता. हे आता त्याला आठवणार नाही. बाळासाहेबांचे नाव घेणे आमचा अधिकार आहे. त्यापासून आम्हाला कोणी रोखणार नाही. नेहरू, टिळक, आंबेडकर यांचे नाव घेण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यकता नाही, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.