Chitra Wagh, Uddhav Thackeray
Chitra Wagh, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Chitra Wagh : नितीशकुमार ज्या मार्गावर चाललेत त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh: महाराष्ट्रापाठोपाठ बिहारच्या राजकारणातही मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजप सोबत असलेली आघाडी तोडून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी (RJD) सोबत युती करत आरजेडीच्या पाठिंब्यावर नवं सरकार स्थापन केलं आहे. या संपूर्ण घडामोडींदरम्यान कुठलाच पर्याय दिसत नसल्याने जे घडतंय ते पाहत राहण्याची हतबलता भाजपावर आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडूनही टिका करण्यात येत आहे. नितीश यांनी निवडलेला जो मार्ग आहे त्याला उद्धव मार्ग म्हणतात, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav THackeray) यांना चिमटा काढला आहे.

चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, "नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात..." अशा शब्दात वाघ यांनी ठाकरे यांना टोला लगावत डिवचलं आहे.

ज्यावेळी भाजप महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सरकार स्थापन करण्यात गुंतला होता. तेव्हा बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या जेडीयूसोबत भाजपाचे खटके उडत होते. नितीशकुमार यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर न पटल्याने त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून जेडीयू आणि भाजपमधील तणाव शिगेला पोहोचला होता. केंद्रीय मंत्री अमित शहा हे सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, असे नितीश कुमार यांचे म्हणणे होते. पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला होता. अखेर नितीश यांनी भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आणि आरजेडी सोबत आज नवं सरकारही स्थापन केलं आहे.

जेडीयूच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आरसीपी शिंह यांनी गेल्या आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला होता. 2017 मध्ये, आरपीसी सिंह हे नितीशकुमार यांचे प्रतिनिधी म्हणून जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार यांनी सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सिंह यांच्या माध्यमातून भाजप पक्ष फोडू शकते असा संशय नितीशकुमार यांना होता. त्यामुळेच महाराष्ट्रात जी अवस्था शिवसेनेची झाली ती आपली होऊ नये या भावनेतूनच त्यांनी भाजपचा हात सोडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांनी भाजपची सोडलेली साथ भाजप नेत्यांना खटकत असल्याने ते नितीश यांच्यावर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी साथ सोडत ज्याप्रकारे महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन केले आणि त्यानंतर शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. हाच धागा पकडत वाघ यांनी नितीश याच्या निर्णयाला राजकारणातला उध्दव मार्ग, असे म्हणत ठाकरेंना डिवचण्याता प्रयत्न केला आहे. आता या टिकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT