BJP leader Chitra Wagh
BJP leader Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh : संजय राठोडांबाबत प्रश्न विचारताच चित्रा वाघ का भडकल्या ?

सरकारनामा ब्युरो

Chitra Wagh : ठाकरे गटात गेलेले माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारला असता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या अचानक पत्रकारांवर भडकल्या. यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत शुक्रवारी हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणावर तत्कालीन आघाडी सरकारला भाजपनं धारेवर धरलं होते. चित्रा वाघ यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात सत्तातर झाल्यानंतर राठोड हे शिवसेना सोडून ठाकरे गटात गेले आहेत.

राठोड यांच्याबाबत आज पत्रकारांनी चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारांवर भडकल्या. चित्रा वाघ म्हणाल्या, "राठोड प्रकरणी मी न्यायालयात गेली आहे. सुपारी घेऊन मला प्रश्न विचाराला येतात का ? असल्या पत्रकारांना बोलावू नका,"

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागणारे राठोड यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रिपद मिळाले आहे. मात्र यावरून विरोधकांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे, यामध्ये भाजप जरी सत्तेत सहभागी असला तरी चित्रा वाघ यांनी मात्र राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध कायम ठेवला आहे. यामुळे पोहरादेवीच्या महंतांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यता महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच काही दिवसापूर्वी दिला आहे.

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात वर्षभरापूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पण या आत्महत्येच्या मागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT