Chitra Wagh Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh News: उद्धवजी…! तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नव्हे, तर...'', चित्रा वाघ कडाडल्या

Chitra Wagh Reply To Thackeray: '' भाजप द्वेषाच्या इंधनावर जळणारी तुमची मशाल....''

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad BJP News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानचा पाच दिवसांचा दौरा करून शनिवारी (ता.२६) परतले.राज्य दुष्काळाच्या छायेत असताना त्यांनी केलेल्य़ा या दौऱ्यावर ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.त्याचा खरपूस समाचार भाजपच्या आक्रमक नेत्या आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रविवारी (ता.२७) घेतला.

भाजप(BJP) द्वेषाच्या इंधनावर जळणारी तुमची मशाल (ठाकरे शिवसेनेचे चिन्ह) अखेर तुमच्याच बुडाला आग लावणारी ठरेल,अशी जळजळीत टीका वाघ यांनी शिवसेनेच्या वाघावर (ठाकरे) केली. उद्धवजी…! तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नव्हे, तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी आहे,असा हल्लाबोल चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी केला.

जपान दौऱ्यावरून देवेंद्रजींना हिणवताना मशालीच्या प्रकाशात स्वत:चा चेहरा,जरी न्याहाळला असता, तरी आपलं भेसूर रूप पाहून तुम्हीही काळवंडला असता,अशी जळजळीत टीका त्यांनी केली.दुष्काळात जपानचा दौरा केला, अशी बोंब मारताना कोरोना काळात तुम्ही अडीच वर्षे घरात दडून बसला होतात, याचा विसर पडू देऊ नका, असा टोला त्यांनी लगावला.

पुन्हा-पुन्हा वडिलांच्या नावाची उजळणी करून राजकारणात अस्तित्व टिकवण्याची धडपड व्यर्थ आहे,असेही उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray) वाघ यांनी सुनावले.तुम्हारा नाम बोलता होगा...हमारा तो काम बोलता हैं.…अशा या ट्विटरवरील जहरी टीकेचा शेवट वाघ यांनी केला.आता त्यावर ठाकरेंकडून वा त्यांचे नेते,खासदार आणि संपादक संजय राऊत यांच्याकडून काय प्रत्युत्तर येते,याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT