Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

भाजपसाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; फडणवीस बैठकांना हजर राहणार, मतदानाचा मार्गही मोकळा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीला काही तासांचा कालावधी उरलेला असताना भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे चार दिवसांपासून घराबाहेर न पडलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता ते पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहू शकणार आहेत. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. (Rajya Sabha Latest Marathi News)

ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर चार दिवसांपूर्वी फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते घरीच विलगीकरणात असल्याने पक्षाच्या बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते. पण व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, मोबाईलच्या माध्यमातून ते सर्व सुत्र हलवत होते. कोरोनामुळे राज्यसभेचं मतदान कसं करणार, याबाबतही चर्चा सुरू होत्या. (BJP Leader Devendra Fadnavis corona report Negative)

कोरोनाची लक्षणे गेल्यानंतर फडणवीसांना पुन्हा चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट काहीवेळापुर्वीच आला असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता काही तासांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकाआधी फडणवीस सक्रीय होणार आहे. त्यांच्या सागर निवासस्थानी भाजपची बैठक असून त्यातही ते सहभागी होतील.

सदाभाऊ खोत सहावे उमेदवार

भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे.

याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. एका उमेदवाला विजयी होण्यासाठी 27 मतांची गरज आहे. तर भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यामुळे पाचव्या व सहाव्या उमेदवारासाठी भाजपकडून मतांची जुळवाजुळव कशी केली जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT