Devendra Fadanvis
Devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

...तर मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन! फडणवीसांचा ठाकरेंना टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बाबरीचा ढाचा पाडला त्यावेळी आपण तिथंच होतो, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकताच केला होता. त्यावर बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी 1857 च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल, अशी खिल्ली उडवली होती. त्याला फडणवीस यांनी बुधवारी (ता. 4) प्रत्युत्तर दिलं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, जे मर्सिडीज बेबी आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, जे मर्सिडीज बेबी आहेत. यांना ना संघर्ष करावा लागला, ना संघर्ष पाहिला. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. पण आमच्यासारखे लाखो कारसेवक आहेत. कितीही थट्टा उडवली तरी आम्हाला गर्व आहे. बाबरी ढाचा पाडला त्यावेळी आम्ही तिथे होतो. त्यावेळी मी नगरसेवक होतो, असा पुनर्रच्चार फडणवीस यांनी केला.

मी हिंदू (Hindu) आहे. त्यामुळे मागील जन्मावरही विश्वास आहे आणि पुर्नजन्मावरही विश्वास आहे. कदाचित मागच्या जन्मात मी असेन तर मग 1857 च्या युध्दात मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्याहीवेळी तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल. कारण आता तुम्ही युती अशा लोकांशी केली आहे, जे 1857 ला स्वातंत्र्ययुध्दच मानत नाहीत. ते म्हणतात, ते शिपायाचं बंड होतं. त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते बोलू दे, अशा शब्दांत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं.

काय म्हणाले होते फडणवीस?

भाजपच्या (BJP) एक मे रोजी मुंबईत झालेल्या सभेत फडणवीस म्हणाले होते की, मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर तुमची हातभर फाटली, आणि सांगता मशिद पाडली. मी तो ढाच्या पाडण्यासाठी होतो. तुम्ही कुठे होतात. १८ दिवस मी जेलमध्ये होतो. बाबरी पाडली त्यावेळी महाराष्ट्रातील एकही शिवसेनेचा (Shivsena) नेता नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. बाबरी पाडली त्यामध्ये ३२ आरोपी होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणताच शिवसेनेचा नेता नव्हता. आमचा दोष काय आहे तर आम्हला प्रसिद्ध करता येत नाही. ज्या वेळी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तो कारसेवकांनी आणि राम भक्तांनी पाडला, असेही फडणवीस म्हणाले होते. त्यावरच आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT