Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

देवेंद्र फडणवीस, फ्रान्सचा मॉरीस कोंबडा अन् गरूडावर बसलेला डोमकावळा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आपले जे जुने मित्र होते ते स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते. ते आता अजान स्पर्धा घेऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) जनाब बाळासाहेब ठाकरे लिहित असतील तर त्यांचे त्यांना लखलाभ आहे. त्यांना मुंबई महापालिकेची (BMC) चिंता आहे. परंतु, त्यांनीही माहिती आहे की अमराठी आणि मराठी हे दोघेही त्यांना मत देणार नाहीत, असा हल्लाबोल भाजप (BJP) नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शिवसेनेवर (Shivsena) केला. याचबरोबर फ्रान्समधील मॉरिस कोंबड्याचेही उदाहरण त्यांनी दिले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत झाली. या वेळी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेला धारेवर धरले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन ते बाळासाहेबांना जनाब म्हणत असतील तर त्यांचे त्यांना लखलाभ आहे. खरेतर मोदीजींनी विकासाचा मुद्दा हाती घेऊन सर्वसमावेशक राजकारण केले. आम्ही लांगुलचालन करणार नाही आणि व्होटबँकेचे राजकारण करणार नाही. देशविरोधी ताकदीशी आम्ही कधीही हातमिळवणी करणार नाही. निवडणुका हरलो तरी चालेल पण आम्ही त्यांच्या विरोधातच राहू.

सध्या काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्हीवर बसून नॅरेटिव्ह सेट करतात. फ्रान्समधील एक खूप फेमस खटला आहे. मॉरिस कोंबड्याचा हा खटला होता. हा कोंबडा रोज सकाळी बांग द्यायचा. त्याचे खूप कौतुक व्हायचे. परंतु, नंतर तो दुपारी बांग देऊ लागला. हे प्रकरण अखेर न्यायालयात गेले. आताही सकाळी बांग देणारे काही लोक दिवसभर टीव्हीवर बांग देऊ लागले आहेत. त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले.

गरुडावर कावळा बसतो आणि त्याला चोच मारतो. गरुड काहीही करीत नाही. तो पंख पसरतो आणि आकाशात झेप घेतो. गरुड अशा उंचीवर जातो की कावळ्याला श्वासच घेता येत नाही अखेर तो खाली पडतो. भाजप हा गरुडासारखा आहे. कितीही डोमकावळे आपल्या मानेवर बसले आणि चोची मारल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. या सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरणार आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT