Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

ठाकरे गटातील मोठा नेता नाराज?

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या नावा चर्चा आहे. नार्वेकर हेदेखील शिंदे गटात सामील होतील, असा दावा अनेक दिवसांपासून केला जात आहे. नार्वेकर यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्विटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.

नार्वेकर यांनी अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर भाजपचे (BJP) नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठे विधान केले. नार्वेकर नाराज असल्याचे मी ऐकतोय असे महाजन म्हणाले, ते एका वृत्ता वाहिनीशी बोलत होते. महाजन म्हणाले, अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ देण्यात काहीही गैर नाही. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. मोठे नेते आहेत, अनेक वर्षांपासून नार्वेकर 'मातोश्री'वर असायचे.

या कारणामुळे अमित शहा (Amit Shah) आणि नार्वेकर यांची ओळख आहे. नार्वेकर आणि माझी मागील काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भेट झालेली नाही. मात्र, चर्चा सुरू आहे की ते नाराज आहे, असे महाजन म्हणाले. शिवसेना पक्षात (उद्धव ठाकरे गट) कोण राहील, त्यांची साथ कोण सोडेल हे सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यातील एका सभेत मिलिंद नार्वेकर लवकरच आमच्या गटात येणार आहेत, असे विधान केले होते. पाटील यांच्या या विधानानंतर नार्वेकर यांच्याकडून काहीही उत्तर न आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चे अधिकच रंगल्या होत्या.

दसरा मेळावा होण्याआधी नार्वेकर यांनी एक ट्विट केले होते. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली. असे या ट्वीटमध्ये म्हटले होते. त्यांनी या ट्वीटद्वारे मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे, असा संदेश दिला होता. मात्र, आता महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT