Sanjay Pandey, Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

सोमय्या संतापले; संजय पांडेंना आणणार अडचणीत

किरीट सोमय्या हे बुधवारी दुपारी 12.30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या शनिवारी खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाला होता. बनावट एफआयआर दाखल केल्याप्रकरणी सोमय्या यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मंगळवारी पुन्हा एका खार पोलीस ठाण्यात धाव घेत एफआयआरबाबत विचारणा केली. आधीच्या एफआयआरवर आपली सही नसल्याची कबुली पोलिसांनी दिल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

पोलिसांनी आपल्या नावाने बनावट एफआयआर लिहिली. पोलिसांनीच नकली सही केली. त्यावर नकली कारवाईही सुरू केली आहे. माझी एफआयआर पोलिसांनी घेतलेली नाही, असे आरोप सोमय्या यांनी केली आहे. त्यानंतर ते मंगळवारी दुपारी खार पोलीस ठाण्यात गेले. सुमारे दीड तास ते तिथं होते. बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा संजय पांडे यांच्यावर टीका केली.

सोमय्या म्हणाले, एफआयआर अवैध असल्याचे पोलिसांनी कबूल केले आहे. पोलिस आयुक्तांचा फोन आल्यानंतर बनावट एफआयआर नोंदवले. उद्धव ठाकरेंच्या गुंडांकडून माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी 105 मिनिटं जबाब नोंदवला. संजय पांडे यांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी पेपर फाडले. पांडे यांनी पाठवल्यानुसार बनवाट एफआयआर नोंदवले गेले. त्याबाबत तक्रार देण्यासाठी आज आलो होतो. पण तक्रार घेतली नाही. बनावट एफआयआरच्या आधारावर तपास सुरू आहे. याविरोधात बुधवारी दुपारी साडे बारा वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (२३ एप्रिल) दुसऱ्यांदा हल्ला झाला. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले असता खास पोलिस स्टेशनजवळ किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे. दरम्यान हल्ल्यानंतर बोलताना हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

सोमय्या यांच्यावर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आवारात देखील हल्ला झाला होता. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणासाठी सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. हा हल्ला देखील शिवसैनिकांनीच केल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. दरम्यान दोन वेळा झालेल्या या हल्ल्यांनंतर CISF वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT