Deepak Kesarkar, Uddhav Thackeray, Kirit Somiya Latest news Sarkarnama
मुंबई

भाजप-शिंदे गटामध्ये वादाची पहिली ठिणगी; केसरकर फडणवीसांकडे करणार तक्रार

Kirit Somiya|BJP|Shivsena : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kirit Somaiya : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर विविध आरोप करत जेरीस आणलेले भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somiya) यांनी भाजप-शिंदे गट सरकार स्थापन झाल्यानंतही शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करणे सोडलेलं नाही. यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Deepak Kesarkar & Kirit Somiya Latest news)

सोमय्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देतांना माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्या बदल अभिनंदन, अशी जळजऴीत टीका ठाकरे यांच्यावर केली आहे. मात्र, सोमय्यांच्या या टीकेवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अक्षेप नोंदवला. आपण याबाबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज शुभेच्छा दिल्या. यानंतर ट्विटरच्या माध्यमातून माहिती देतांना ते म्हणाले की, "मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबदल अभिनंदन केले," अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, या टीकेवर शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांवर लगेच हल्लाबोल केला. ज्यांच्यावर आपण आरोप केले आता त्यांच्यासोबत आपली य़ुती झाली आहे. आता ते चालतात का? असा सवाल करत सोमय्यांना प्रत्युत्तर दिले असून आम्ही सोमय्यांना गांभिर्यांने घेत नाही, असे त्या म्हणाल्या.

पेडणेकर म्हणाल्या, शिंदे गट एका बाजूला म्हणतो की आम्ही शिवसेना सोडली नाही. आजही आम्ही उद्धव ठाकरे यांचा आदर करतो मग सोमय्यांनी केलेली टीका त्यांना चालते का?, असा सवाल उपस्थित केला. यावर लगेच शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आपले स्पष्टीकरण देत सोमय्यांच्या टीकेवर तिव्र अक्षेप घेतला आणि भाजप आणि शिंदे गटात झालेल्या बैठकीत एकमेकांच्या नेत्यांवर यापुढे टीका करायची नाही, असे ठरल्याचे सांगितले. मात्र याबाबत सोमय्यांना माहिती नसावी,अशी सावरासावर त्यांनी केली. आज आपण शिर्डीला आहे. मात्र याबाबत आपण फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोमय्यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, उद्धव ठाकरे, अनिल परब, संजय राऊत आणि पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केलेल्या कारभाराला मी माफियाराजच म्हणेल, असे त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील मतभेद तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या वादावर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT