Chandrasekhar Bawankule  Sarkarnama
मुंबई

Chandrasekhar Bawankule : भाजपचा नेता भडकला, दिलं मोठं चॅलेंज; 'ईव्हीएम'वर जिंकलेल्या 'मविआ'च्या खासदार-आमदारांची केली कोंडी

BJP MLA Chandrasekhar Bawankule MVA MP MLA opposing EVM machine Mumbai : 'ईव्हीएम'वर पराभवाचे खापर फोडणारे 'मविआ'ला भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोटारडे म्हणत, चॅलेंज दिले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडी 'ईव्हीएम' मशीनविरोधाच दिवसागणित आक्रमक होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय हा 'ईव्हीएम'चा विजय आहे, असे म्हणून भाजप महायुतीला डिवचलं आहे. यावरून भाजप नेते प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे महाविकास आघाडीवर भडकलेत.

बावनकुळे यांनी 'मविआ'च्या खासदार-आमदारांना सुनावत, 'ईव्हीएम'वर जिंकून आलेल्या सर्वांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हे आपलं चॅलेंज आहे, 'मविआ'च्या खासदार-आमदारांनी राजीनामा देऊनच दाखवावा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सोलापूरमधील मारकडवाडी गावानं बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी माॅक पोल घेण्याचा प्रक्रिया राबवली. या निर्णयाला आणि प्रक्रिया प्रशासनाने विरोध केला. यानंतर देखील मारकडवाडी निर्णयावर ठाम राहिले आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. प्रशासनाने यावर गावात जमावबंदी लागू केली. गुन्हे दाखल केल. काहींनी अटक केली. यानंतर मारकडवाडी गाव देशात चर्चेत आले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मारकडवाडी गावाला भेट दिली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मविआ'वर टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "शरद पवार आणि 'मविआ'ने (MVA) खोटारडेपणा करणे योग्य नाही. शरद पवार यांनी पराभव स्वीकारावा. आता जनतेची दिशाभूल करून आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेत मोठा पराभव झाला. जनतेने नाकारलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभवाची भीती आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करून, जमानत वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. मारकडवाडीमध्ये ग्रामस्थ नाहीत. तर ते पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत".

"मारकडवाडीमध्ये आताच 'ईव्हीएम'वर मतदान झालेले नाही. यापूर्वी देखील 'ईव्हीएम'वर झालेल्या मतदानाची आकडेवारी तपासून घ्यावी. आताच आक्षेप का? असा सवाल करत 'ईव्हीएम'ला दोष देत पवारसाहेब पराभव लपवत आहे. राहुल गांधी, पवारसाहेब यांनी कितीही नौटंकी केली, तरी महाराष्ट्र हा विकासाच्या बाजूने आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला देशात एक नंबरचे राज्य करू", असा विश्वास देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

'या खोटारडेपणातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान महाविकास आघाडी करत आहे. 'मविआ'चे राज्यात 31 खासदार 'ईव्हीएम'वर निवडून आले आहेत. आता यांनी त्यांचे राजीनामे दिले पाहिजेत. महाविकास आघाडीचे जे आमदार-खासदार 'ईव्हीएम'वर निवडून आले आहेत, त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वाखाली आमचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे. आम्ही त्यातून शिकलो आणि पुढं गेलो आहे', याची आठवणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT