Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
मुंबई

युसूफ लकडावालांचे पवार, राऊत अन् मातोश्रींशी संबंध; कंबोज यांचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता राणा यांची चौकशी करणार का असा राऊत यांनी केला होता. त्यावर आता भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केली आहे.

काँग्रेसचे माजी खासदार अहमद पटेल, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या सगळ्यांचे युसूफ लकडावाला यांच्याशी चांगले संबंध होते, असा आरोप कंबोज यांनी केला आहे. संजय राऊत काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. सलीम जावेदच्या गोष्टी आता राऊत यांनी बंद कराव्या. ज्यांना काही कळत नाही त्यांना राज्यसभेचे इतके वर्ष खासदार कसे काय केले हे उद्धव ठाकरे यांनाच माहिती, असा टोलाही कंबोज यांनी लगावला. युसुफ लकडावाला यांच्याकडून राणा दांपत्याने हा फ्लॅट विकत घेतला होता. त्या फ्लॅटचे पैसे त्यांनी लकडावाला यांना दिले, असेही कंबोज यांनी सांगितले.

उगाच दोन मिनीटांसाठी खालच्या पातळीवर राजकारण करणारे राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचे स्व:ताचे घोटाळे बाहेर आले प्रॅापर्टी जप्त झाली. त्याबद्दल काय बोलणार, युसूफ लकडावाला आणि संजय राऊत यांचेही चांगले संबंध होते. महाबळेश्वरच्या हॅाटेलवर राऊत अनेकदा जाऊन राहतात, असा आरोप कंबोज यांनी केले आहे. मातोश्रीवर त्यांचे नेहमीच येणे जाणे असते त्याबद्दल काय बोलणार, असा सवालही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांना स्व:ताच्याच विधानवरून माघार घ्यावी लागेल. राऊत हे पवारांची खुर्ची उचलतात तर मग त्यांनी लकडावालांची खुर्ची उचलली असेल. ची चौकशी करायची आहे तर करा ना कोणी अडवले, मात्र तक्रारदार कोण आहेत.

मुंबईत माझ्यावर हल्ला झाला. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. सगळे जण याबद्दल बोलत आहेत. पुरावे आहेत तर मग काय कारवाई केली संजय पांडेंनी. भाजप नेत्यांसोबतच्या कारवाईत भेदभाव का? संजय पांडे यांना आता राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यांनी थेट मैदानात याव आम्ही दोन हात करायला तयार आहोत. मुंबई पोलिस आयुक्त स्व:ताच्या अकाऊंटवरून का बोलतात? माणूस मेल्यावरच गुन्हा दाखल करणार का, असा सवाल कंबोज यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT