Nilesh Rane News Sarkarnama
मुंबई

Nilesh Rane News : नीलेश राणेंच्या नाराजीमागे 'तो' मंत्री कोण? फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं?

Chetan Zadpe

Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी काल राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र, अवघ्या २४ तासांमध्ये त्यांची नाराजी दूर होऊन आता ते पुन्हा नव्या जोमाने राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नीलेश राणे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल दीड तास या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. यामध्ये फडणवीसांनी स्वत: लक्ष देण्याचं आश्वासन दिले आहे. (Latest Marathi News)

स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना नीलेश राणे यांनी व्यक्त केली होती. काल ट्विट करत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. राजकारणाचा वीट आल्याचे सांगून, आता राजकारणात मन रमत नाही, असे त्यांनी सांगितले होते. यानंतर ही महत्त्वाची भेट पार पडली आहे. 'निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत कलह नको, एकदिलाने निवडणुकीच्या कामाला लागा, ' असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले.

राज्य सरकारमधील एका मंत्र्यांच्या राजकीय कुरघोडीमुळे, वाढत्या हस्तक्षेपामुळे नीलेश राणे यांनी राजीनामा दिला असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. तसेच, राजकीय समीकरण बदलल्यामुळे स्थानिक पातळीवर राजकारणाची फारशी संधी राहिली नसल्याचा मुद्दाही समोर आला होता. त्यामुळे आजच्या भेटीनंतर त्यांच्यासमोरील अडचणी संपणार का? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT