BJP Pankaja Munde Sarkarnama
मुंबई

Pankaja Munde : 'यह सिर्फ झांकी है, आता विधानसभा बाकी'; पंकजा मुंडेंनी यशाचं गणित उलगडलं !

Pradeep Pendhare

Mumbai News : 'विधान परिषद निवडणुकीत मिळालेले यश महायुती सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात दडले आहे, असे सांगून यह सिर्फ झांकी है, विधानसभा बाकी आहे', अशी प्रतिक्रिया विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. चुरशी निवडणूक झाली. कोणाला शह मिळणार, याची उत्सुकता होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे समर्थन असलेले जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशातच पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली. या निवडणुकीतून विधानसभेची तयारी सुरू केल्याची सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. पंकजा मुंडे (Pankaja Mudhe) म्हणाल्या, 'लोकसभेला माझा पराभव झाल्याचे मला वाटत नाही.देशात सर्वाधिक मतं घेणाऱ्या पाच-दहा लोकांमध्ये मी देखील आहे.

पक्षाने मला विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा संधी आणि सन्मान दिला. त्याचा पूर्ण उपयोग पक्षासाठीच करेल. या विजयामुळे राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तो माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे'. आगामी येणाऱ्या निवडणुकीला त्याचा नक्कीच फायदा होईल. ही ताकदच आहे. 'यह झांकी है, अजून विधानसभा बाकी आहे', असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या सर्वांना खात्री होती, की महायुतीला नऊ पैकी नऊ जागा मिळतील. ही विधानसभेची पूर्व तयारी होती. महायुतीचे विधान परिषदेतील हे यश अर्थसंकल्पात दडले आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारने विकासाचे धोरण ठेवले आहे, त्याला आमदारांकडून पसंती मिळाल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT