Mumbai News, 08 Sep : "ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी मराठ्यांचं नुकसान केलं. EWS बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंची कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत," अशा शब्दात भाजप (BJP) नेते प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगेंनी "हे राजेंद्र राऊत बोलत नाहीत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतात," असा आरोप केला होता. याच मुद्द्यावरून प्रसाद लाड यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणारा प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात.
हे मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे यांची कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत."
तसंच मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की, हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा, असं आव्हान यावेळी लाड यांनी जरांगेंना दिलं.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला. "मी फुकलो असतो तर उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले होते," असं दावा राऊत यांनी केला. राजेंद्र राऊत यांच्या या आरोपाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, "मी राजगादीचा किती आदर करतो, हे उदयन महाराजांना माहिती आहे.
तुम्ही मराठ्यांचे तुकडे पाडायला बसला आहात. तुमच्यापेक्षा सोपल बरे. आपल्या विचारांचे ओबीसी बरे. शिवाय हे सर्व राजेंद्र राऊत बोलत नाहीत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतात," असं जरांगे यांनी प्रत्तुत्तर दिलं होतं. राऊतांवर टीका करतानाही जरांगे यांनी फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे भाजप नेत्यांनी आता जरांगे यांच्यावर टीका करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.