Prasad Lad, Pravin Darekar
Prasad Lad, Pravin Darekar Sarkarnama
मुंबई

प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोध नाहीच! मुंबै बँकेवर बिनविरोध

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या (Mumbai District Central Co-Operative Bank) पंचवाषिक निवडणुकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) बिनविरोध निवडून जाणार आहेत. उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्याविरोधात कुणीच अर्ज न भरल्याने दोघांची बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवड होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. 3) अर्ज भरण्याची मुदत होती. अखेरच्या दिवशी बँकेवर वर्चस्व असलेल्या सहकार पॅनेलच्या 21 उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकारी कैलास जेबले यांनी अर्ज स्वीकारले. या उमेदवारांमध्ये दरेकर व लाड यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत, सिध्दार्थ कांबळे, संदीप घनवट, नंदकुमार काटकर, विठ्ठलराव भोसले, अभिजित अडसूळ, पुरूषोत्तम दळवी, आनंदराव गोळे यांचाही समावेश आहे.

अभिषेक घोसाळकर, विष्णू घुमरे, अनिल गजरे, जयश्री पांचाळ, जिजाबा पवार, सोनदेव पाटील, विनोद बोरसे, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, नितीन बनकर या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. या पॅनेलच्या विरोधात काही मोजक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवारही त्यांचे अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने सहकार पॅनेचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडूण येण्याची शक्यता आहे.

अखेरच्या दिवशी दरेकर व लाड यांच्याविरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरेकर हे बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा पुढील पाच वर्षे तेच अध्यक्षपदी राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश मिळताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT