Pravin Darekar News, Mumbai Bank fraud case news updates
Pravin Darekar News, Mumbai Bank fraud case news updates Sarkarnama
मुंबई

प्रवीण दरेकर हाजीर हो..! आठवडाभरात दुसऱ्यांदा पोलीस ठाण्यात हजेरी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात दरेकरांना पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावले होते. यानुसार आज दरेकरांनी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. मागील आठवड्यातही दरेकर चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले होते. आज भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर जमून घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Pravin Darekar News)

मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी दरेकरांना पुन्हा एकदा समन्स बजावले. याआधी 4 एप्रिलला दरेकरांनी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावली होती. दरेकर आज पुन्हा चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले. यामुळे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना तंबी दिल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी बंद केली.

या वेळी बोलताना दरेकर म्हणाले की, एकदा सखोल चौकशी झाल्यानंतर पुन्हा मला बोलावण्याची का गरज लागली? छळायच्या उद्देशाने मला बोलावले आहे. कितीही वेळा बोलवलं तरी जाऊ चौकशीला. सर्वच प्रश्नाची उत्तरं मी दिली आहे. शांतपणे मी चौकशीला सामोरा जाणार आहे. आम आदमी पक्षाला दुसरं काही काम नसल्यानं त्यांनी तक्रार दिली. त्या पक्षात अनेक अपप्रवृत्ती आहेत, त्याकडे त्यांनी आधी लक्ष द्यावे. आमच्या विरोधकांनी हातमिळवणी करून केलेलं हे षड्यंत्र आहे.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT