Gurujyot Singh joins NCP Latest Marathi News
Gurujyot Singh joins NCP Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

मुंबईत शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपला धक्का : अजितदादांच्या उपस्थितीत बांधले घड्याळ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाला (BJP) आज मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते गुरूज्योज सिंग यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला रामराम ठोकत हातात घड्याळ बांधले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. (NCP Latest Marathi News)

गुरूज्योत सिंग हे मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूज्योत सिंग यांच्यासह भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपमधील अन्य भागातील पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी प्रवेश केला.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजन समाज पक्षालाही धक्का दिला आहे. चंद्रपूर महापालिकेतील पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवक पतीने गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच गायक आनंद शिंदे यांच्या अनेक समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. बसपच्या नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल व त्यांचे पती सुधीर कारंगल यांचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केले.

चंद्रपूर महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपने चमत्कार केला होता. या पक्षाचे आठ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. भाजपने 36 जागा मिळवत सत्ता काबीज केली होती. यावर्षी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीकडून आता इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावले जात आहे. (NCP Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT