Vinod Tawade Latest News
Vinod Tawade Latest News  Sarkarnama
मुंबई

हर घर म्हणा किंवा हर हात म्हणा पण प्रत्येकाला तिरंगा घ्यावाच लागत आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपने देशभरात हर घर तिरंगा एक मोठं अभियान सुरू केला आहे. या अभियानाचा राष्ट्रीय संयोजक म्हणून मी देशभरातील विविध भागातील आढावा घेत आहे. या अभियानाला देशातील सर्वच भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामध्ये पाडे, खेडेगावात देखील मोठा उत्साह दिसत आहे.

या आभियानामध्ये सर्वच पक्ष सहभागी होत असून आम्ही हर घर तिरंगा म्हणतो तर काहीजण हर हात तिरंगा म्हणत आहेत. पण तिरंगा प्रत्येकाला घ्यावा लागत आहे, असा टोला भाजप (BJP) नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) विरोधकांना लगावला आहे. ते आज मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलत होते. (Vinod Tawade Latest News)

तावडे म्हणाले, कश्मीर येथील श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणे मुश्किल होते. मात्र आज तेथील घंटाघर पूर्णपणे तिरंग्याने सजलं आहे. देशातील विविध भागात तिरंगा यात्रा निघत आहे. देशाच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देश्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे पुढील 25 वर्ष हे अमृत काल म्हणून साजरा केला जाणार आहे. या काळात देशात कोणकोणत्या क्षेत्रात देशाने झेप घ्यायची याचे नियोजन केंद्र सरकारने केला आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं सुरू आहे. 2047 मध्ये भारत प्रत्येक क्षेत्रात कसा असेल आणि जगात कसा श्रेष्ठ ठरेल यासाठी या अभियानातून हा भाव निर्माण काम केले जाणार आहे. उद्यापासून तीन दिवस प्रत्येक घरी तिरंगा लावावा. आतारपर्यंत 20 कोटी तिरंग्याचे वाटप करण्यात आले आहे. तर गेले दोन दिवस प्रभात फेऱ्या सायकल रॅली, ट्रॅक्टर रॅली आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाचा पक्ष अध्यक्ष जे.पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा आढावा घेत आहेत. या अभियानात सर्वजण सहभागी होत असल्याचे तावडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, या अभियानामध्ये सर्वच पक्ष सहभागी होत असून आम्ही हर घर तिरंगा म्हणतो तर काहीजण हर हात तिरंगा म्हणत आहेत. पण तिरंगा प्रत्येकाला हातात घ्यावा लागत आहे. टीका करणारे काहीजण म्हणतात की हर घर तिरंगा आहे. मात्र घरच कुठे आहे. मात्र माझा प्रश्न 2014 ला सत्तेत येण्याच्या आधी जे सत्तेत होते त्यांना आहे. की आपण काय केल? पण तरीसुद्धा 2014 नंतर 2 कोटी 53 लाख 19 हजार 705 घरे मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून भाजपला हा प्रश्न विचारणारांनी आतापर्यंत एका घराण्याकडे सत्ता होती त्यांना विचारला तर अधिक संयुक्त होईल, असा टोलाही त्यांनी कॅाग्रेसला लगावला.

हर घर तिरंगा हा एका पक्षाचा, व्यक्तीचा कार्यक्रम नाही. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांसाठी आपल्या घरावर तीन दिवस तिरंगा लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. त्यामुळे देशात तिरंगामय वातावरण निर्माण झाला आहे. या मोहिमेची नियोजन गेले एका वर्षभरापासून सुरू होत. त्यामुळे सर्वांनी आपला देश म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन तावडे यांनी केले. तसेच कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, नाना आधी टीका करतात आणि नंतर त्यामध्ये बदल होतो. त्यामुळे त्यांना इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT