BJP leaders
BJP leaders sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध; माजी आमदारांचा कार्यक्रम स्थळीच ठिय्या

सरकारनामा ब्यूरो

भाईंदर : नाट्यगृहाच्या उद्घाटणासाठी मिरा-भाईंदर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. यात पालिकेने जातीने भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवल्याचा आरोप, भाजपचे माजी आमदारांनी केला. माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळीच ठिय्या आंदोलन केले.

नाट्यगृहासह पालिका मुख्यालय व रुग्णालयच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज मिरा भाईंदरमध्ये आले होते. त्यानुसार विविध ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्यमंत्री गानसामग्री भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात आले. त्यानंतर नाट्यगृहाचे उद्घाटन झाले.

नाटगृहाच्या उद्घाटनात वाद होऊ नये म्हणून पालिकेकडून यंदा आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधीना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, माजी आमदार नरेंद्र मेहता व माजी महापौर ज्योस्त्ना हसनाळे हे भाजपच्या माजी नगरसेवकांसह कार्यक्रम स्थळी आले, असता त्यांचा सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला.

यामुळे कार्यक्रमस्थील वाद झाला. विशेष अतिथी म्हणून निमंत्रण असलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता व ज्योस्त्ना हसनाळे यांना प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी होकार दिला. मात्र, सभागृहात जागा नसल्याचे कारण देत इतर माजी लोकप्रतिनिधीचा प्रवेश नाकारला. आमंत्रण दिले असताना देखील कार्यक्रमात प्रवेश दिला जात नसल्यामुळे भाजप माजी नगरसेवकांनी विरोध केला.

त्यामुळे मेहतासोबत त्यांच्या समर्थकांनी नाट्यगृहाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन केले. तसेच कार्यक्रमांची पत्रिका फाडून आंदोलन केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाला भाजप कडुच विरोध करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी पालिका प्रशासनाकडून निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली होती. मात्र, आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र प्रवेश पत्रिका तयार केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला, असा आरोप भाजप नेत्यांनी केला. सरनाईकांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून माजी लोकप्रतिनिधीसाठी आरक्षित ठेवलेल्या आसनांवर ठाम मांडले. त्यामुळे भाजप पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा जागे अभावी प्रवेश नकरण्यात आला, असा आरोप नरेंद्र महेता यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT