Aditya Thackeray,Amit Satam
Aditya Thackeray,Amit Satam sarkarnama
मुंबई

बालहट्टासाठी मेट्रो का रोखली ; साटम यांचा ठाकरेंना सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता मुंबईला येणाऱ्या पर्यावरण आपत्तीपासून वाचविण्यासाठी मेट्रोचा प्रश्न त्वरित मार्गी लावा,'' अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम (Amit Satam)यांनी केली आहे. याबाबत साटम यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.

''आपण राज्य करीत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने गेल्या १० वर्षांमध्ये सुमारे ३९ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिलेली आहे व त्यामधील २१ हजार झाडे हे प्रायव्हेट बिल्डरच्या प्रकल्पाकरीता तोडण्याची परवानगी दिलेली आहे. ३९ हजार झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई करावी'' असे साटम यांनी पत्रात नमूद केलं आहे.

''कारशेडसाठी आपण मुंबईची मेट्रो थांबवली. मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक आहे. बालहट्टासाठी अन् राजकीय स्वार्थासाठी आपण ही मेट्रो थांबवली आहे. या मेट्रोचा मार्ग लवकर सुकर करा,'' अशी मागणी साटम यांनी केली आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात साटम म्हणतात..

आपल्याकडे पर्यावरण खाते व वातावरणीय बदल मंत्री आल्यापासून महाराष्ट्राने अनेक वादळं, अतिवृष्टी, महापुराला तोंड दिले आहे. हा निसर्गाचा प्रकोप पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे झाला आहे. आपल्या स्वार्थी कृतीमुळे आपण मुंबईलाही अशाच निसर्ग प्रकोपात ढकलण्याची तयारी करत आहात.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, आपण राज्य करीत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने गेल्या १० वर्षांमध्ये सुमारे ३९ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिलेली आहे व त्यामधील २१,००० झाडे हे प्रायव्हेट बिल्डरच्या प्रकल्पाकरीता तोडण्याची परवानगी दिलेली आहे

एका बाजूला ज्या मेट्रोमुळे कितीतरी कार्बन फ्रुटपिंट वाचणार आहेत हे वैज्ञानिक तथ्यांनुसार सिद्ध झालं आहे आणि तीच बाब सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलेली असून, म्हणूनच मेट्रो कारशेडसाठी २,७०० वृक्षांच्या तोडणीला मान्यता दिली गेली होती कारण त्याच्या बदल्यामध्ये ३ पट नवीन झाडे ही लावण्यात येणार होती.

मेट्रोचा प्रश्न मार्गी लागत असतानाच त्यात फक्त राजकीय इरसेपोटी आपण विरोध केला आणि मुंबईकरांचा सोयीस्कर होणारा प्रवास हा मुंबईच्या खड्यात असणाऱ्या रस्त्यात ढकलला. मुंबईसाठी अति आवश्यक असलेली मेट्रो ही रोखली आहे.

३९ हजार झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई करावी, अन्यथा महापालिकेतील सत्ताधारी सेनेमुळे मुंबई बुडल्याशिवाय राहणार नाही, असे आपले लाडके बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इक्यालसिंग चहल यांनीच म्हटलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT