Ashish Shelar, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar News : बाळासाहेबांच्या सुपुत्राने करून दाखवलं... शिवसेना आता "गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली!

Mangesh Mahale

Mumbai : भाजपचे नेते, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करून दाखवलं...?" असे सांगत शेलारांनी खोचक टिप्पणी करीत विषयाची यादीच दिली आहे.

आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असा आरोप करणाऱ्या शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर टीका केली आहे. "शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!; सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले !" असा टोला शेलारांनी लगावला आहे.

राज्यातही उद्धव ठाकरे अनेक छोट्या-मोठ्या संघटनांना एकत्र करून आघाडी उभी करत आहेत. त्यातच त्यांनी आता राज्यातील समाजवादी पक्ष आणि संघटनांना एकत्र केले आहे. रविवारी या पक्षांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. यावर शेलारांनी भविष्यात शिवसेना आणखी कुणाशी युती करणार, याची माहिती दिली आहे.

"गर्व से कहो हम हिंदू हैं" म्हणणारी शिवसेना आता.."गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली..! भविष्यात कदाचित "गर्व से कहो हम MIM हैं" सुद्धा म्हणू लागतील, असे टि्वट करीत शेलारांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.

कालच्या (रविवारी) समाजवादी पक्ष आणि संघटनांच्या बैठकीमध्ये ठाकरे म्हणाले, "मला विश्वास बसत नाही की समाजवादी लोकांनी कुटुंब प्रमुख मानले. मला लाडके माजी मुख्यमंत्री मानले. आज तुम्ही मला फुलेंची पगडी दिली. मी म्हटले मला हातात द्या, डोक्यावर नको, ती झेपण्यासाठी तेवढच डोकं हवं. टोपीखाली काय आहे. काहींना डोकी नसतात 21 संघटना माझ्यासाठी एकत्र आल्यात हे भाग्य समजतो. शिवसेना प्रमुख मला कायम सांगायचे लोकांना तू आवडावे म्हणून खोटे मुखवटे घालू नकोस."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT