<div class="paragraphs"><p>Dilip Walse Patil</p></div>

Dilip Walse Patil

 
sarkarnama
मुंबई

शिवसेनेचे ते खासदार येणार अडचणीत; वळसे पाटलांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबतचे पडसाद विधानसभेतही उमटले. या बाबत शिवसेना (ShivSena) आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत दाखल केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले की, याबाबत आमदार शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणात 100 साक्षीदारांची साक्ष नोंदवून ही घेण्यात आली आहे. पोलिस पुढील कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी भाजप आमदार मनिषा चौधरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी भाजपच्या महिलांबाबत केलेल्या त्रविधानावरुन त्यांच्यावर कारवाई का होत नाही? याकडे सरकारचे लक्ष वेधले. भाजप नगरसेविका शितल गंभीर यांनी मरिन लाईन पोलिस ठाण्यात ( संजय राऊत) यांच्या विरोधात 9 डिसेंबरला तक्रार केली आहे. त्यावरुन गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल भाजपकडून करण्यात आला.

तसेच भाजप आमदार अमित साटम यांनी नगरसेविकांचा स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर करण्यात आलेला विनय भंग आणि त्याबाबत पोलीसांनी न केलेल्या कारवाई बाबत प्रश्न विचारला यावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, खासदारांनी महिलांचा अवमान केलेल्या वक्तव्याबाबत दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून मरिन लाईन पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. पोलिस याबाबत चौकशी करुन पुढील कार्यवाही लवकरात लवकर करतील, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर नगरसेविकांच्या विनयभंग प्रकरणी ही चौकशी करण्यात येईल, असेही गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT