Sharad Pawar, Atul Bhatkhalkar Latest News
Sharad Pawar, Atul Bhatkhalkar Latest News sarkarnama
मुंबई

'वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा' : भाजप नेत्याचा पवारांना टोला...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजप (BJP) - शिवसेना (Shivsena) युती २०१९ ला तुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात रोजच महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंड केल्यावर राज्यात सत्तांतर होऊन भाजप सत्तेत आले आहे. यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदाक संघर्ष बघायला मिळत आहे.

दरम्यान लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्याचे महाराष्ट्रापसारखे कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी राज्यातील भाजप नसलेल्या सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष देऊन त्यांच्यामागे सीबीआय, ईडीच्या (ED) यंत्रणांचा वापर करत सत्ता उलथवून टाकण्याच काम भाजपकडून केलं जात असून हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा, अशा खोचक शब्दात राष्ट्रवादी कॅाग्रेवर टीका केली आहे.

भातखळकरांनी ट्विट करत शरद पवार आणि ऱाष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, "पवार मात्र लवासा, आयपीएल, इफ्तार पार्ट्या, भ्रष्टाचारी-दाऊद टोळीवाल्यांची वकिली अशा लोकोपयोगी कामात सतत गुंतलेले असतात...वसूलीचा छंद जूना राष्ट्रवादी पुन्हा...", अशा शब्दात त्यांनी पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

पवार यांनी भाजपवर टीका करतांना भाजपच्या फोडा आणि राज्य करा या नितीवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले की, गुजरात, आसाम या दोन राज्यातील सत्ता वगळता त्यांना लोकांनी सत्तेवर येऊ दिलं नाही. लोकशाही मार्गाने सत्ता मिळवता येत नसल्यामुळे भाजपवाले देशातील बिगर बीजेपी पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला आणि करत आहे. अनेकांना कारण नसतांना अटक केला जात आहे. भाजपने २०१४ साली निवडणुकीत अच्छे दिनची फक्त घोषणा केली होती. मात्र देशातील जनतेला अच्छे दिन आतापर्यंत जाणवत नाही, असा टोला देखाल लगावला होता. यावरच प्रतिक्रिया म्हणून आता भातखळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT