BJP MLA Ganpat Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; आमदार गायकवाडांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार

Bhagyashree Pradhan

Ulhasnagar Crime News :

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात आरोपींची मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे. आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांनी आज सकाळी सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे महापालिका हद्दीतील कळव्यात मेडिकल टेस्ट करण्यात आली.

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी काल उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे तर एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Ganpat Gaikwad Firing

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांची मेडिकल टेस्ट झाल्यानंतर त्यांना कळवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांना उल्हासनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. सत्ताधारी भाजपचे (BJP) आमदार गणपत पाटील यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

एका आमदाराची पोलिस ठाण्यातच विरोधकावर गोळीबार करण्याची हिंमत होते कशी, असा सवाल या निमित्ताने विचारला जातोय. या प्रकरणात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील जखमी झाले आहेत. आणि त्यांच्यावर ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीरातील गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत काल (शुक्रवार) शिंदे गटाकडून पुन्हा पाडण्यात आली. त्यानंतर हा वाद थेट हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचला होता.

तीन दिवसांपासून भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात द्वारलीतील महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात गाववाल्यांच्या जमिनी घेतल्या पण त्यांचे पैसे दिले नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. शिवाय आमचे बँक खाते तपासा, असे आव्हानही आमदार गणपत गायकवाडांना देण्यात आले होते. तर आमदार गायकवाडांनी महिलांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला होता.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT