Mumbai News : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या झाल्यानंतर कल्याणमधील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येत आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या कल्याणमध्ये जात पोलिसांची भेट घेऊन चर्चा केली.
यानंतर भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मूक मोर्चा काढत पोलिसांना जलद गतीने तपास करावा, अशी मागणी केली. गायकवाडांचे आंदोलन म्हणजे भाजपला घरचाच आहेर, अशी आता चर्चा सुरु झालेली आहे. (Latest Political News)
कल्याण पूर्वेत भाजप आमदार गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनेविरोधात शुक्रवारी सायंकाळी मूक मोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदविला. पालिकेचे ड प्रभाग कार्यालय ते कोळसेवाडी पोलीस ठाणेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. राज्यात गृहखाते भाजपकडे असताना भाजप आमदारांनी काढलेला हा मोर्चा म्हणजे घरचा आहेर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
याबाबत आमदार गायकवाड म्हणाले, "सत्ता आमची असली तरी गुन्हेगारांवर कारवाईची मागणी करतो. कोणतीही गोष्ट असो विकासाची किंवा मग पोलीस बळाची आपण ती मागणी धरून ठेवली पाहिजे. आज नाही तर उद्या आपल्याला न्याय मिळेल. एक दिवस मागणी केल्यावर दुसऱ्या दिवशी ती लगेच मिळेल असे नाही. पोलीस बळ वाढवायचे असेल तर प्राधान्याने विचार केला जाईल. नवीन पोलीस भरती होणार आहे, त्यावेळी ज्या ठाण्यात मनुष्यबळ कमी आहे, तिथेही भरती केली जाईल."
"कल्याणमधील एका सोसायटीत दबा धरून बसलेल्या माथेफिरुने एकतर्फी प्रेमातून १२ वर्षीय मुलीची हत्या केली आहे. याचा लवकर तपास लागावा म्हणून निवेदन देण्यासाठी पोलिसांशी चर्चा केली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. कल्याणमध्ये पोलिसांची संख्या ही खूप कमी आहे. पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे गुन्हेगार वाढले आहेत. राजकीय लोकांना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो, तो कमी झाला पाहिजे. सर्वसामान्य लोकांसाठी पोलीस बंदोबस्त दिला गेला पाहिजे. मुलीला न्याय मिळावा म्हणून हा खटला 'फास्टट्रॅक'वर चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून बोलणार आहे", असेही आमदार गायकवाडांनी स्पष्ट केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.