Manda Mhatre
Manda Mhatre sarkarnama
मुंबई

आमदार मंदा म्हात्रे संतापल्या; त्या पोलिसांची ईडीमार्फत चौकशीची मागणी

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिस आयुक्तालयात देखील सचिन वाझे आहेत. असा आरोप भाजप (BJP) आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी केला आहे. नवी मुंबई पोलिस दलातील सचिन वाझेंची चौकशी केली जावी, अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे.

या संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी आज (ता. १९) पत्रकार परिषदेत घेतली. नवी मुंबईत अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. पोलिसांकडून एनएमएसए क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली केली जात आहे. राज्यात सर्वात जास्त लक्ष्मी दर्शन नवी मुंबईत होत असल्याने अनेक पोलिस अधिकारी यांच्या दहा-दहा वर्ष बदल्याच झालेल्या नाहीत, असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे.

या पोलिस अधिकाऱ्यांची थेट ईडीकडून चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली आहे. तसचे म्हात्रे यांनी या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT