Nitesh Rane,  
मुंबई

स्वार्थापोटी का होईना, पेडणेकर आमचा लढा लढताहेत ; राणेंनी डिवचलं

राज ठाकरेंची चाललेली घौडदौड थांबविण्याठी किणी प्रकरणाची रसद आतल्या गोटातूनच मीडियाला देण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushantsingh Rajput)याची मॅनेजर दिशा सॅलियन हिचा बलात्कार करून तिची हत्याच करण्यात आली आहे. सुशांतसिंग आणि दिशा यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप पाच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी केला. आज (बुधवारी) आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत महापैार किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) डिवचलं आहे.

काही दिवसापूर्वी मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ''दिशा सॅलियन हिच्या मृत्यूनंतरही तिला काही जणांनी बदनाम केले. तिला न्याय मिळाला नाही,'' असे त्या म्हणाल्या होत्या, यावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी टि्वट केले आहे. 'मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर..वेळ आणि तारीख कळवा,'' असे राणेंनी पेडणेकरांना म्हटलं आहे.

आज नितेश राणे म्हणाले, ''महापौर किशोरीताई पडणेकर यांना संजय राऊत दिशा सालियनवर चर्चा नको असे प्रेस कॅान्फर्नसमध्येच ठणकावत होते. पण ताई थांबल्या नाहीत. त्यांनी महिला आयोगाला पत्रही लिहले, आणि सॅलियन परिवाराला मिडीयासोबत भेटही दिली. इतकेच नाही तर मागे त्यांनी त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात असे स्वतःच जाहीर केले. त्यांचा हा उत्साह कदाचित आदित्य ठाकरेंनी जेंव्हापासून छूपी घोषणा केली की पंचेचाळीस वयोवर्ष वरच्या नगरसेवकांचे तिकीटे कापले जाईल त्यामुळेच असेल,''

''मुळात या प्रकरणाचं राजकारण सेनेच्या अंतर्गत वादामुळं होतंय. ज्याप्रमाणे राज ठाकरेंची चाललेली घौडदौड थांबविण्याठी किणी प्रकरणाची रसद आतल्या गोटातूनच मीडियाला देण्यात आली होती. काही आदित्य ठाकरेंच्या युवासेनेला लगाम घालण्यासाठी घडत आहे. मी ताईंना धन्यवाद देतो की त्या स्वार्थापोटी का होईना पण आमचा लढा लढताहेत,''

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात थेट महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यासंबंधीचे एक पत्रही त्यांनी महिला आयोगाला पाठवले आहे. त्यानंतर महिला आयोगाने या पत्राची दखल घेत मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सूचक ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केल आहे. 'मालवणी पोलिस ठाण्याची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद आहे. आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण ८ जूनच्या रात्री त्या ठिकाणी रोहन राय पण उपस्थित होता आणि दिशा मोकळ्या जागेत येऊन त्याच्याशी का बोलत होती? असा सवाल नितेश राणेंनी ट्विटद्वारे केला आहे.

त्याचबरोबर मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून तक्रार दिली आहे. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलीस स्टेशन दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. म्हणजेच 8 जूनच्या रात्री काहीही घडले नाही हे दाखवण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा प्लॅन केला जात आहे. चला, मला आनंद आहे की, शेवटी ते स्वतःची कबर खोदत आहेत! असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT