Nitesh Rane
Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

अधिश बंगल्याला नोटीस पाठवल्यावर नितेश राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : जे कोणी या सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना सरकारकडून अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व राज्यातील जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाहीत म्हणून हे शेंबड्या मुलासारखे लढत आहेत, अशी टीका भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) केली आहे. दरम्यान, आज (ता.18 फेब्रुवारी) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याला अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीवर मुंबई महापालिकेकडून (BMC) राणे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे सर्व पाहत आहे. राणे कुटुंबीय, किरीट सोमय्या, मोहित कंबोज असो किंवा देवेंद्र फडणवीस जे कोणी या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. हे मैदानात आम्हाला हरवू शकत नाही. तसे असते तर यांनी मला जिल्हा बॅंक जिंकण्यापासून रोखल असत. मात्र, हे खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाहीत. मैदानात हरायचं आणि शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. त्यांना ज्या-ज्या प्रकारे लढायचे आहे ते लढूद्या आणि अंगावर येऊ द्या त्यांना आम्ही नाही म्हणत नाही. मात्र, त्यांनी जा कायदेशीर नोटीस आम्हाला पाठवली तीला आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन उत्तर देणार आहे, अश्या शब्दात नितेश राणेंनी याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत त्यालाअजून तडका दिला. यामुळे अजूनच वाद चिघळला असून आरोपांच्या फैरी अजून जोरात झडू लागल्या आहेत. अलिबागमधल्या कोरवाई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या नावावर १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यावरून आता याबाबत राऊत आणि सोमय्या यांच्यात चांगलीच जुंपली असतांना राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार टीका केली आणि या वादात उडी घेतली. आता हा वाद राणेंच्या बंगल्यापर्यंत पोचला असून त्यांच्या जुहू येथील बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना आता मुंबई पालिकेकडून नोटीस बजावली असून त्यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी पालिकेचे पथक जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणावर नितेश राणे यांनी तिखट प्रतिक्रिया देत शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. यामुळे हा वाद चिघळण्याचे चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT