Sanjay Raut, Vinayak Raut, Nitesh Rane sarkarnama
मुंबई

संजय राऊत अन् विनायक राऊत ठाकरेंचे पाळलेले कुत्रे; राणेंची जीभ पुन्हा घसरली

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत, दिशा सॅालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यानंतर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा राऊतांवर निशाणा साधला आहे.

चेंबूरच्या टिळक नगरमध्ये शिवजयंती कार्यक्रमाला नितेश राणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, आणि विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, संजय राऊत आणि विनायक राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी दिवसभर भुंकत असतात, हे ठाकेंचे पाळलेले कुत्रे आहेत, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली. विनायक राऊत हे पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप करत आहेत. 2014 ते आतापर्यंत शिवसेना सत्तेमध्ये आहेत. 2014 ते 2019 पर्यंत सावंत गृह राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला. राणे कुटुंबीय हे आंब्याचे झाड असल्यामुळे विरोधक टार्गेट करत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

विनायक राऊत काय म्हणाले होते?

आज पत्रकारपरिषदेत देखील राणेंनी अत्यंत पुचाटपणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून फार काही त्याची दखल घ्यायला पाहिजे असे वाटत नाही. मात्र, दुसऱ्यावर खूनाचे आरोप करत असताना, खून पचवणे, खूनाचे आरोप उघड न करणे, असे जे राणेंनी पत्रकार परिषदेत आरोप केले. त्यावेळी राणेंना त्यांच्या वाढत्या वयामुळे आता कदाचित विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत असेल, असा टोला लगावला होता.

त्यामुळे कदाचित त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नसेल. तर मला त्यांना आठवण करून द्यावी लागेल. की इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गमध्ये ज्या पद्धतीने राणेंच्या कारकीर्दीत खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी अशा पद्धतीचे जवळपास ९ वर्ष प्रकार होत होते. मग रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर या सगळ्यांचे निघृण पणे केलेले खून, हे कोणी केले? कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खूनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी, म्हणून कोण होते? हे आम्हाला देखील जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये, अशा इशाराही राऊत यांनी दिला होता.

सिंधुदुर्गमधील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की या सगळ्या खूनांच्या मागचा खरा सूत्रधार कोण होता. हे केवळ मी आता बोलतो असे नाही. तर नारायण राणेंची कुंडली ज्या पद्धतीने विधान परिषदेत या महाराष्ट्राचे माजी अत्यंत विद्वान आणि अभ्यासू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ज्यावेळी वाचन केले. ते वाचन मी तुम्हाला ऐकवतो. असे म्हणून राऊतांनी फडणवीसांचा विधानपरिषदेतील तो व्हिडिओ सर्वांना दाखला. ज्यामध्ये फडणवीस हे भाजपवर केलेल्या टीकेवरून राणेंवर निशाणा साधताना दिसत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT