Nitesh Rane
Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

शिवसैनिकांनी हल्ला केलेल्या मोहित कंबोज यांच्या पाठीशी आता नितेश राणे!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर काल (ता. २२ एप्रिल) रात्री सव्वानऊच्या सुमारास शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यात कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले मात्र, कुणालाही दुखापत झालेली नव्हती. यावरुन भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे कंबोज यांच्या पाठीशी उभे राहिले असून, त्यांनी शिवसेनेला (Shivsena) इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी काल कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सत्या या हिंदी चित्रपटातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात चित्रपटातील नायक सत्या व भिकू म्हात्रेचा एक संवाद आहे. सत्या हा भिकू म्हात्रेच्या गळ्यावर चाकू ठेवतो आणि म्हणतो, 'मौका सभी को मिलता है.' मौका सभी को मिलता है, मोहित कंबोज हम आपके साथ है,असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता कंबोज यांच्या पाठीशी नितेश राणे उभे राहिल्याचे समोर येत आहे. यावरून पुन्हा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

मुंबईत राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना असा हाय व्होल्टेज ड्राम कालपासून सुरू आहे. त्यातच काल रात्री कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यामुळे मुंबईतील वातावरण आणखी तापले आहे. मोहित कंबोज हे गाडीतून मातोश्रीजवळ येताच शिवसैनिक आक्रमक झाले. कंबोज हे मातोश्रीची रेकी करण्यासाठी आले आहेत, असा आरोप शिवसैनिकांनी केला . त्यानंतर त्यांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. कंबोज यांच्या ताफ्यात एकूण पाच गाड्या होत्या. या हल्ल्यात कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. पण कोणालाही दुखापत झालेली नाही.

मोहित कंबोज यांच्या झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अशा प्रकारचा हल्ला होणे, हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. कारण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्या पक्षाचे प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे पोलिसांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करतात, यावरून महाराष्ट्र कुठे चालला आहे, हे दिसून येते. दररोज अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT