Nitesh Rane
Nitesh Rane sarkarnama
मुंबई

BJP News : राऊतांबाबत भाजपचा मोठा निर्णय ; नितेश राणेंवर मोठी जबाबदारी ; ठाकरेंची अनेक गुपितं उघडणार..?

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane on Sanjay Raut press conference : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल करीत असतात. त्यांच्या या पत्रकार परिषदेवर अनेकदा विरोधकांनी टीका केली आहे.

राऊतांच्या सकाळच्या या पत्रकार परिषदा बंद करा, अशी मागणी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर आता आणखी एका पत्रकार परिषदेची सवय राज्यातील जनतेला करावी लागणार आहे. त्याबाबत भाजपने आज निर्णय घेतला आहे. (Political Short Videos)

राऊतांचा एकेरी उल्लेख..

राऊतांच्या रोजच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी राज्यातील भाजप पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर राऊतांनी केलेल्या आरोपांना आता भाजप नेते उत्तर देणार नाहीत, तर आमदार नितेश राणे हे राऊतांना प्रत्युत्तर देणार आहेत. आज त्याचा प्रारंभ झाला. आज सकाळी राऊतांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर घणाघात केला. राणेंनी राऊतांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना इशारा दिला.

राऊतांची लायकी नाही..

नितेश राणे म्हणाले, "शिंदे-फडणवीसांवर बोलण्याची राऊतांची लायकी नाही. भाजप नेत्यांच्या विरोधात राऊत बोलले तर आम्ही उद्धव ठाकरेंची अनेक गुपितं उघडी करु. ठाकरेंच्या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे. राऊतांनी विचार करुन भाजपवर बोलावं,"

ठाकरे कुटुंबियांची बदनामी...

"राऊतांनी राणेंना ओळखलं नाही. राऊतांसारखी माणसं चोरबाजारात मिळतात. राऊतांमुळे ठाकरे कुटुंबियांची बदनामी होते. राऊतांनी यापुढे चौकटी राहावं, त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली तर ठाकरेंचं गुपीतं उघडी करणार," असा इशारा राणेंना दिला.

नऊ वाजता वाजणारा भोंगा बंद करा

यापूर्वी भाजप, शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत त्या बंद कराव्यात, असे म्हटलं आहे. "संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा बंद करावा," अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT