BJP MLA Prasad lad, CM Uddhav Thackeray
BJP MLA Prasad lad, CM Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

होय, आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे...! प्रसाद लाड यांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी केला. त्यावर भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे. (CM Udhhav Thackeray Latest Marathi News)

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणानंतर लाड यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. 'होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, भ्रष्टाचाऱ्यांपासून... होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, वसुलीजीवी लोकांपासून... होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, मुंबईकरांच रक्त पिणाऱ्या बांडगुळांपासून..,' असं ट्विट लाड यांनी केलं आहे. (BJP MLA Prasad Lad Latest Marathi News)

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई सुरू करणार आहेत. कुणी मागितली, आम्ही मागितली नाही. हा डाव मुंबई तोडण्याचा आहे. मुंबई स्वतंत्र करणार, म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे की, स्वातंत्र्यपूर्ण काळात तुमची मातृसंस्था असलेला संघ अस्तित्वात आहे. पण एकदाही संघ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुम्ही नव्हता. या लढ्यात तुम्ही जनसंघ म्हणून होता. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. त्यावेळी ही समिती स्थापन झाली. त्यावेळी जागा वाटपावरून जनसंघ बाहेर पडला, अशी टीकाही त्यांनी केली.

चंद्रकांतदादांनी घेतला समाचार

शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल, डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया देत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेतील भाषणावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. हे सुद्धा विसरले.

अतुल भातखळरांचाही निशाणा

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजचे भाषण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजप विरोधात गरळ ओकणारे असे भाषण होते. अत्यंत असंस्कृत आणि निलाजरे भाषण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT