BJP Van, BJP Pol Khol Andholan News, BJP Poll Khol Campaign News Updates, Prasad Lad news updates
BJP Van, BJP Pol Khol Andholan News, BJP Poll Khol Campaign News Updates, Prasad Lad news updates Sarkarnama
मुंबई

भाजपच्या पोलखोल अभियान रथावर दगडफेक; लाड म्हणाले हिंमत असेल तर समोर या...

सरकारनामा ब्यूरो

चेंबूर : मुंबई भाजपच्या (BJP) वतीने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government)मुंबई महापालिकेतील (BMC) भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्प येथील भाजप कार्यालयात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरुवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आदल्या रात्रीच अज्ञातांकडून रथाचे (वाहनाचे) नुकसान करण्यात आले आहे. (BJP Poll Khol Campaign News Updates)

या गाडीचे नुकसान हे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तर गाडीची फोडतोड करणाऱ्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजप चे सगळे नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला समोर जावं लागेल, असा इशाराही लाड यांनी दिला आहे.

लाड म्हणाले की, भाजपकडून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यात येत आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रात्रीच्या अंधारात हा पाठीमागून हल्ला करण्यात आला आहे. ज्याप्रकारे 2019 ला पाठीत खंजीर खुपसण्याच काम त्यांनी केल तशाच प्रकारचा हा हल्ला त्यांच्याकडून करण्यात आला आहे. माझे त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर समोर येऊन दगड मारून दाखवा. याचबरोबर पोलिसही त्यांना साथ देत आहे. पोलखोल अभियान होणार आहे. हे पोलिसांना माहिती होती तर गाडीला संरक्षण का दिले नाही. आरोपीला अटक करण्यात आली नाही तर आम्ही ही गाडी घेऊन पोलिस स्टेशनला जाऊ, रास्ता रोको करू मुंबईतले आमचे नेते अशिष शेलार, विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर व मंगलप्रभात लोढा येथे येणार आहेत. जर येथे काही वेगळे गालबोट लागले तर यास पोलिस प्रशासन आणि महाविकास आघाडी सरकार जाबाबदार असतील, असा इशाराही लाड यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपने झालेल्या वाहनाच्या नुकसानीस थेट महाविकास आघाडीस आणि पोलिसांना जबाबदार धरले आहे. याबाबत आता महाविकास आघाडी किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT