Rahul Narevkar | Ramraje naik nimbalkar
Rahul Narevkar | Ramraje naik nimbalkar Sarkarnama
मुंबई

सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् आता जावई होणार विधानसभेचे अध्यक्ष

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. ३ जुलै रोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून (bjp) कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकर आज संध्याकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपचे १०६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार यामुळे नार्वेकरांचा विषय सोपा मानला जात आहे. राहुल नार्वेकर हे सध्या केवळ ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिवाय ते निष्णात वकील देखील मानले जातात.

या सोबतच नार्वेकर विजयी झाल्यास सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् जावई विधानसभेचे अध्यक्ष असे चित्र निर्माण होणार आहे. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. नार्वेकरांचे बंधू अ‍ॅड. मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातूनच भाजपचे नगरसेवक होते.

नार्वेकर हे मूळचे शिवसेनेचे. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी होवून ते खासदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने नार्वेकरांना विधान परिषदेत संधी दिली. मात्र २०१९ च्या निवडणुकीआधीच नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत ते भाजपचे आमदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT