Sadabhau Khot Sarkarnama
मुंबई

Sadabhau Khot : कौतुकाचे गोडवे गाणारे खोत अचानक महायुतीवर घसरले; राऊतांना दिली 'ही' उपमा

BJP Sadabhau Khot ShivSenaUBT party Sanjay Raut Mahayuti government cabinet : रयत क्रांती संघटनेचे नेते तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची संजय राऊत यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत त्यांच्या आक्रमक टीकेसाठी ओळखले जातात. यातून ते वाद देखील ओढावून घेतात. अनेकदा त्यांनी वादग्रस्त विधानं करताना अडचणीत सापडले आहेत. आता पुन्हा एकदा ते वादात सापडले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे.

मुंबईत महायुती सरकारचे विशेष अधिवेशन सुरू आहे. महायुती (Mahayuti) असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते भाजप आमदार सदाभाऊ खोत यात सहभागी झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना महायुतीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारात छोट्या संघटनांकडे लक्ष देण्याची भूमिका मांडली. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी मात्र त्यांची जीभ घसरली आहे.

सदाभाऊ खोत यांना संजय राऊतांना (Sanjay Raut) डुक्कराची उपमा दिली. डुक्कराची जागा घाणीतच असते. त्यांना कितीही साबणाने धुवा, शाम्पू लावऊ धुवा. ते घाणीतच जाते. संजय राऊत डुक्कर आहे, ते घाणीतच जाणार, अशा खालच्या शब्दात टीका केली. यावर महाविकास आघाडीकडून काय रिअ‍ॅक्शन येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

मध्यतंरी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यासह वाचळवीरांचे कान टोचले होते. आता नेमकं मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे महायुतीचे नेते पु्न्हा वाचळवीरांविषयी सावध झाले आहेत.

सदाभाऊ खोत महायुतीत नाराज

सदाभाऊ खोत मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महायुतीवर नाराज असल्याचे दिसते. मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांना पहिले स्थान द्यावे, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. "लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही एकनाथ शिंदे आणि महायुतीचं काम केलं आहे. आम्ही दोन वेळेस महायुतीच्या मोठ्या पक्षांचा पेरा फेडला आहे. पंचायत समित्या , नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत हे देखील महायुतीने लक्षात घ्यावं. बैल विकली, तर काय होईल, याचा विचार मोठ्या पक्षांनी करावा", असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT