Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar Press Conference : ठाकरेंना बरोबर घ्यायचं का? भाजप आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्टचं सांगितलं

MLA Sudhir Mungantiwar BJP ShivSena Uddhav Balasaheb Thackeray Sena Party : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, एकत्र येणार का? यावर भाष्य केले.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची अलीकडच्या काळात जवळीक वाढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तीन वेळा भेट झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ठाकरेंची झालेली सकारात्मक भेटी चर्चेत आल्यात. यावर भाजप आणि शिवेसना उद्धव बाळासाहे ठाकरे सेना पक्ष एकत्र येणार असल्याच्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "ठाकरे आणि भाजप एकत्र येण्यासंदर्भात, भाजपच्या बैठकांमध्ये, असे कधी विषय आले नाहीत. एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री भाजप (BJP) नेते अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावर निर्णय घेतील. जुन्या गोष्टी विसरून पुढं जायचा ठरल्यास, तो पक्षाचा निर्णय असेल". मात्र, आज एकत्र येण्याची आवश्यकता या क्षणाला दिसत नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस (Congress) आणि शिवेसना एकत्र येण्याचा हा प्रकार समान नव्हता. 24 आॅक्टोबर 2019चा अशुभ वेळ होता. तत्कालीन फायद्यासाठी दूरगामी नुकसान सहन करावे लागते, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

एकत्र येण्याचं सध्या तरी कारण नाही

'शिवसेना आणि काँग्रेस कुठेही समानता नाही. रेल्वेच्या दोन पटरी एकत्र येत नाही. एकत्र आल्यावर अपघात होता. एक पक्ष हिंदुत्वासाठी काम करणारा आणि साधारण हिंदुत्वावर टीका करणारा दुसरा पक्ष. हे दोन पक्ष एकत्र येण्याची कारण नाही', असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

ठाकरेंची CM फडणवीस यांच्याशी जवळीक

दरम्यान, महायुतीला राज्यात मोठं बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. यानंतर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून जवळील वाढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कामानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटी वाढवल्या आहेत.

गाठीभेटीनं चर्चांना उधाण

ठाकरे परिवाराच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेटी वाढत असतानाच, शिवसेनेचे मुखपत्र असलेले 'सामना'मधून देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काही निर्णयाचे कौतुक केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची जवळीक, यावर चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने एकमेकांना मदत करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT