Sambhajirao Nilangekar, Bhagat Singh Koshyari
Sambhajirao Nilangekar, Bhagat Singh Koshyari sarkarnama
मुंबई

राज्यपालांची आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही होणार एंट्री!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत संपुर्ण पॅनल उभे करून सत्ताधारी काँग्रेससला (Congress) आव्हान देऊ पाहणाऱ्या भाजपला (BJP) निवडणुकीआधीच धक्का बसला आहे. अर्ज छाणणी प्रक्रियते भाजपसह काँग्रेसस बंडखोर व इतर विरोधकांचे अर्ज बाद करण्यात आले होते. हे अर्ज बाद करतांना थकबाकी, सह्या नसणे अशी अनेक कारणे देण्यात आली होती. या प्रकरणाबद्दल भाजप आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची मुंबई येथे भेट घेतली.

भाजपच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेश कराड, अभिमन्यू पवार, यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ प्रकरणी कलम १९७ नुसार बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ अनुसार परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भाजप शिष्टमंडळाने राज्यपालाकंडे केली आहे.

निलंगेकर म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रियेत शासकीय अधिकार्‍यांनी बनावट कागदपत्रे व शिक्के यांचा वापर करून खोटे दस्तावेज तयार केले, असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या आधारे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणार्‍या सर्व उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत, असा आरोप निलंगेकर यांनी केला.

काँग्रेस प्रणित पॅनेलच्या विरोधात भारतीय जनता पक्ष प्रणित पॅनलच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते. मात्र छाननी प्रक्रियेत भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहे. याकरिता सत्ताधारी काँग्रेसने सत्तेचा गैरवापर करत प्रशासनाला हाताशी धरून कटकारस्थान रचल्याचे दिसत आहे, असा आरोप निलंगेकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT