Anil Bonde News  Sarkarnama
मुंबई

Anil Bonde News : यशोमती ठाकूरांबाबत बोलताना अनिल बोंडेंची जीभ घसरली; म्हणाले, "ठाकूरांमध्ये इंग्रजांचा 'डीएनए...

Maharashtra Politics : काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधींचा नाही, तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे," असेही बोंडे म्हणाले.

Mangesh Mahale

Amravati : काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur) यांच्यावर टीका करताना भाजप नेते व खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली."इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना 'ठाकूर' पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा 'डीएनए'," असे वादग्रस्त विधान राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केले. (Latest Marathi News)

भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यातील यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ असलेल्या तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात अनिल बोंडे यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. "काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधींचा नाही, तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे," असेही बोंडे म्हणाले.

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू आहे. काल (सोमवारी) ही यात्रा अमरावती येथे आली होती. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. यशोमती ठाकूर यांनी या यात्रेवरून भाजपला टोला लगावला होता. "इलेक्शन आले की, भाजपला असे धंदे सुचतात," अशा शब्दांत ठाकूर यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. त्याला अनिल बोंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

दोन ऑक्टोबरपासून भाजपची ओबीसी यात्रा विदर्भात सुरू आहे. यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. "ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, एकहाती सत्ता असणारे केंद्र सरकार ओबीसींची जनगणना का करत नाही? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते.

भाजपची ओबीसी यात्रा ही महाराष्ट्रात सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सुमारे ४४ विधानसभा व नऊ लोकसभा मतदारसंघांतून जाणार आहे. यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आमदार डॉ. आशिष देशमुख व ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT