Nishikant Dubey Sarkarnama
मुंबई

Nishikant Dubey: मराठी लोक कुणाची भाकर खाताहेत? भाजप खासदारानं ओकली गरळ; राज्याबाहेर या! आपटून आपटून मारु....

Nishikant Dubey on Marathi Controversy: तुमच्यात हिमंत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या, युपी, बिहार, तामिळनाडू मध्ये या, तिथं तुम्हाला आपटून आपटून मारु," अशी गरड भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ओकली.

Mangesh Mahale

Mumbai News: मीरा भाईंदर येथे व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण झाल्यानंतर आता हिंदी-मराठी वाद पेटला आहे, यात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी खतपाणी घातलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

"तुम्ही कुणाची भाकरी खाताहेत, येथे टाटा, बिर्ला, अंबानी आहेत, तेच टॅक्स भरतात, मराठी लोक कुठला टॅक्स भरतात,आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात, तुमच्यात हिमंत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या, युपी, बिहार, तामिळनाडू मध्ये या, तिथं तुम्हाला आपटून आपटून मारु," अशी गरळ भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ओकली. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

निशिकांत दुबे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनी अडचणीत आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींना त्यांना समज देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. काल त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकली होती. आज त्यांनी केलेल्या संतापजनक विधानामुळे मराठी माणसामध्ये त्यांच्याविरोधात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना मारहाण करीत आहेत. त्यांन तुम्हाला मारायचं असेल तर त्यांना मुंबईतील तामिळी, तेलुगु आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारुन दाखवावे. माहिममध्ये जाऊन हिंदी भाषिकांसोबत उर्दु भाषिकाला ठाकरे बंधूंनी मारुन दाखवले तर मी त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार असल्याचे मानेल, आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असे दुबे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT