laxman jagtap  sarkarnama
मुंबई

आमदार लक्ष्मण जगताप ऍम्ब्युलन्सने मतदानासाठी विधानभवनाकडे रवाना

मतदानासाठी आमच्यावर पक्षाने कोणताही दडपण आणले नाही, अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून विधानभवनाकडे रवाना झाले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जगताप हे रुग्णवाहिकेतून मतदानाला आले होते, ते आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने विधानभवनात येत आहेत. यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. ते जवळपास एक वाजता दरम्यान लक्ष्मण जगताप हे विधानभवनात पोहोचणार आहेत. (Maharashtra vidhan parishad election 2022)

लक्ष्मण जगताप हे अतिशय आजारी असल्याने, ते आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या (Legislative Council election2022) मतदानासाठी, एका खासगी कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबई कडे सकाळी दहा वाजता रवाना झाले आहेत.

आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी आमच्यावर पक्षाने कोणताही दडपण आणले नाही. मतदानाला जाण्याचा निर्णय स्वतः आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली आहे.

कसबापेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक या पुण्याहून ऍम्ब्युलन्सने विधानभवनात पोहचल्या आहेत. राज्यसभेच्या वेळी ही टिळक, जगताप यांनी केलेल्या मतदानामुळे भाजपला यश मिळाले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेतील भाजपचे यश जगताप आणि टिळक यांच्या प्रयत्नांना समर्पित केले. फडणवीसांनी टिळक, जगताप यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT