मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या अधीश बंगल्यावरील (adhish bungalow) कारवाई विरोधात प्राधिकरणाकडेच दाद मागण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र राणेंना दिलासा देत 24 जूनपर्यंत बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कायम राहणार आहेत.
राणे यांना एमसीझेडएमएने पाठवलेली नोटीस योग्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.मात्र, पाठविलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करत नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली.
प्राधिकरणाचा निर्णय जर नारायण राणे यांच्या विरोधात गेला तर त्यावर राणे यांना पुन्हा दाद मागण्याचा पर्याय आहे.
आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता.
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं अधिश नावाचा बंगला आहे.
या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती.
तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे.
आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.