Sharad pawar, Devendra Fadnavis
Sharad pawar, Devendra Fadnavis  sarkarnama
मुंबई

BJP-NCP: राष्ट्रवादी देणार छुपा पाठिंबा ? 'या' पदासाठी भाजपचं पुन्हा फोडाफोडी राजकारण...

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics Latest news Update : राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापतीपदासाठी भाजप आग्रही आहे. यासाठी भाजपने चाचपणी सुरु केली आहे. तसेच सध्या रिक्त असलेल्या या पदावर भाजपच्या सदस्याची निवड करण्यासाठीही भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या विधान परिषदेच्या एकूण ७८ जागांपैकी २१ जागा रिक्त आहेत. राज्यपाल नियुक्त १२, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ९ अशा एकूण २१ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके असून भाजपकडे २२ सदस्य आहेत. सभापतीपदासाठी निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मतांची गरज आहे. जिंकण्यासाठी भाजपला आणखी सात मतांची गरज असेल.

राष्ट्रीय समाज पत्राचे महादेव जानकर हे नाराज असले तरी ते भाजपलाच मतदान करतील असे मानले जाते. याशिवाय इतर अपक्ष व लहान पक्षांच्या मदतीने भाजपला हे संख्याबळ मिळवण्यासाठी भाजपने चाचपणी सुरु केली आहे. यासाठी भाजपकडून सभापती पदासाठी राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांची नावे चर्चेत आहे. पण नव्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रवीण दरेकर यांना मंत्रीपदाची संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. तर प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरु असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच राम शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती.

सभापतीपद भाजपकडे यावे यासाठी प्रयत्न 

सध्या विधान परिषदेचे उपसभापतीपद उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळेच भाजपने सभापतीपद आपल्याकडे घेण्यासाठी चढाओढ सुरु केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात पहिल्या एक-दोन दिवसातच सभापतीपदाची निवड करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्याकडे आहे. त्यामुळे झिरवाळ यांचे पद कायम ठेवून विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नही केले जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असे आहे संख्याबळ : भाजप - २२, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - ११, राष्ट्रवादी - ९, काँग्रेस - ८, जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी - १ , अपक्ष - ४ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT