nilesh rane, dhananjay munde
nilesh rane, dhananjay munde sarkarnama
मुंबई

मुंडे, ED ची चिंता करु नका, तुमची खासगी CD निघाली तर वांदे होतील ; राणेंनी डिवचलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : : सक्तवसुली संचालनालयाच्या (ED)चौकशीमुळं राज्यातील महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आघाडी सरकारमधील नेते या अस्वस्थतेला वाचा फोडत आहेत. विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा गैरवापर भाजपकडून केला जात आहे, असे बोलले जाते. महाविकास आघाडीतील नेत्यांमागे ईडी चैाकशी लावून भाजप केंद्रीय यंत्रणांना गैरवापर करीत असल्याचा आरोप आघाडी सरकारचे नेते करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde)यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्याला भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे (nilesh rane)यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राणेंनी टि्वट करीत मुंडेवर हल्लाबोल केला आहे.

''भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे. ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडी तिची किंमत जास्त आहे,'' असे विधान मुंडे यांनी केलं होतं. याचाचं संदर्भ देत निलेश राणे यांनी मुंडेंवर निशाणा साधला आहे.

''धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा,'' असे निलेश राणे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर जमावाकडून चपला फेकण्यात आल्या. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट केलं आहे, ''फडणवीस साहेबांच्या गाडीवर चप्पल मारायची हिंमत पोलिस गरड्यातून करण्यात आली, या डरपोक अवलादी पेक्षा रस्त्यावरचा कुत्रा बरा किमान तो रस्त्यावर उघडपणे त्याला जे करायचं ते करतो,'' असे राणेंनी म्हटलं आहे.

फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पिंपरी-चिंचवड येथील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी जमावाकडून फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्यात आल्या. या प्रकारामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठचार्ज केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT