Delhi-Mumbai Expressway sarkarnama
मुंबई

Delhi-Mumbai Expressway : गडकरींच्या video वर आनंद महिंद्रा म्हणाले, "ही जादू ..'

Delhi-Mumbai Expressway : गडकरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक्सप्रेसवेचे रात्रीचे चित्रीकरण शेअर केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Delhi-Mumbai Expressway :सहा राज्यांमधून जाणारा देशातील सर्वात लांब दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे (Delhi-Mumbai Expressway) आज (ता.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे 1,386 किमी लांबीसह भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे. या एक्सप्रेसवेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यावर उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गडकरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक्सप्रेसवेचे रात्रीचे चित्रीकरण शेअर केलं आहे. हा व्हिडिओ पाहून मल्टीलेन रस्त्यांवर रात्र कशी असेल, याची कल्पना येऊ शकते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

आनंद महिंदा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. "तुम्ही आम्हाला आठवण करून देता की पायाभूत सुविधा कंटाळवाणे नसतात - ते जादुई असू शकते." मी दिवसा या एक्स्प्रेस वेवर गाडी चालवण्याचा विचार करत होतो, पण आता रात्री प्रवास करायचा विचार करेन," असे त्यांनी म्हटलं आहे.

असा आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे

  1. सोहना (हरियाणा)-दौसा (राजस्थान) सेक्शन हा नवी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे मार्गाचा पहिला टप्पा आहे.हा महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल.

  2. हा महामार्ग कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना देखील जोडेल.दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे प्रवासाचे अंतर 1,424 किमीवरून 1,242 किमीपर्यंत 12% कमी होईल.

  3. दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 24 तासांवरून 50% कमी करून 12 तासांवर येईल.हा आठ लेनचा एक्स्प्रेस वे आहे, जो 12 लेनपर्यंत सहज वाढवता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT