Rajiv Satav sarkarnama
मुंबई

सातव यांच्या जागेवर राज्यसभेसाठी चुरस; भाजपचा उमेदवार मैदानात

उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे: काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजपने (Bjp) उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिनविरोध होईल असा अंदाज असलेली ही निवडणुक आता चुरशीची होणार आहे. सातव यांचे एप्रिल महिन्यात कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर या जागेसाठी निवडणुक प्रक्रिया आता जाहिर झाली आहे. (BJP nominates Sanjay Upadhyay for Rajya Sabha seat)

भाजपने या जागेसाठी संजय उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने अजून उमेदवारी जाहीर केली नाही. राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या बरोबरच काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा आहे. निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता भाजपने उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस पाह्यला मिळणार आहे.

राज्यसभेतले पक्षीय बलाबल लक्षात घेता ही निवडणूक काँग्रेससाठी महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसचे अनेक नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे काँग्रेसला सभागृहात अनुभवी नेत्यांची गरज आहे. ही निवडणुक बिनविरोध करण्याचे भाजप समोर मोठे आव्हान असणार आहे. भाजपने उमेदवारीर जाहीर करुन, २२ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे.

निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार यावर चर्चा होत आहे. प्रज्ञा सातव यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून निवड केली आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेला संधी मिळेल अशी चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT