Sadabhau khot - vinayak mete
Sadabhau khot - vinayak mete sarkarnama
मुंबई

विधानपरिषद निवडणूक : खोत-मेटेंचा पत्ता कट; भाजपने मित्रपक्षांच्या तोंडाला पुसली पानं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या चेहऱ्यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

या यादीतून माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, माधव भंडारी, केशव उपाध्ये अशा पक्षातील चर्चेतील नावांचा आणि सदाभाऊ खोत, विनायक मेटे या मित्रपक्षांच्या नेत्यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि मेटे यांना विश्रांती देण्यात येणार असल्याचे बोललेही जात होते. अखेर आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आता केवळ रासपचे महादेव जानकर हे एकमेव मित्रपक्षाचे आमदार विधानपरिषदेमध्ये असणार आहेत. . (BJP Announced candidates name for Legislative Council Election)

दरम्यान, सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) सभापती रामराजे निंबाळकर संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील. या दोन जागांचा फायदा काँग्रेसला होणार आहे. काँग्रेसने आपले दोन उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत.

विधान परिषदेसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ५३, शिवसेना (Shivsena) ५६ आणि कॉंग्रेसचे (Congress) ४४ आमदार आहेत. तर अपक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या सहाय्याने त्यांच्या सहा जागा निवडून येवू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT