Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : "मुर्मूंच्यापूर्वी भाजपकडून मला राष्ट्रपतीपदाची ऑफर होती, पण...", आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Prakash Ambedkar on BJP : "मी उघडपणे भाजपबरोबर जाऊ शकतो, मात्र..." असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

Akshay Sabale

Maharashtra Political News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी भाजपनं मला ऑफर दिली होती. पण, तुम्ही मला राजकारणातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करताय का? असा सवाल मी भाजपला केला, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. 'लोकशाही' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

"द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी मला राष्ट्रपतीपदासाठी भाजपनं ( Bjp ) ऑफर दिली होती. तेव्हा, माझ्या राजकीय जीवनातील १० वर्षे अजून शिल्लक असून तुम्ही मला राजकारणातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करताय का? असा प्रश्न भाजपला मी विचारला होता. 2024 मध्ये राजकीय पक्षांनी चांगली कामगिरी केली, तर मी तुमच्या विरोधात आहे, याची कल्पना तुम्हाला आहे. त्यामुळे मला बाजूला करण्याचा प्रयत्न चालूय का?" असं भाजपला विचारल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आम्हाला ज्या रस्त्यातून जायचं नाही, त्याचा आम्ही कधीही विचार केला नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं आमच्याविरोधात कितीही भूमिका घेतली किंवा चळवळ मोडून काढण्यापर्यंत आले, तरी आम्ही भाजपाबरोबर कधीही हातमिळवणी करणार नाही," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

"भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आव्हान देण्याची क्षमता फुले-आंबेडकरांची चळवळीत आहे. मला मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती केलं, तरीही मी भाजपबरोबर जाणार नाही," असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

तुम्ही 'इंडिया' आघाडीबरोबर येण्याबाबत नेहमी कुजबूज होत असते. याबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "कुजबूज करणारे भाजपत गेले आहेत. चौकशांपासून वाचवण्यासाठी भाजपत जात आहेत. पण, मी उघडपणे भाजपबरोबर जाऊ शकतो. मला कुजबूज करण्याची गरज काय? मला भाजपबरोबर जायचं, तर उद्या जाईन. राष्ट्रीय पातळीवर युती करण्यासाठी भाजपनं ऑफर दिली आहे," असा मोठा दावाही आंबेडकरांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT