Amruta Fadnavis, Pankaja Munde
Amruta Fadnavis, Pankaja Munde sarkarnama
मुंबई

Pankaja Munde यांना सत्तेचा प्रसाद मिळेल का ? ; फडणवीसांच्या गणपतीचे घेतले दर्शन

सरकारनामा ब्युरो

-दत्ता देशमुख

बीड : राज्यात शिंदे - फडणवीस सरकारची स्थापना व मंत्रीमंडळ विस्तारानंतरच्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बरेच काही सांगून जातात. सरकार स्थापनेच्या काळात व तत्पुर्वी व नंतर त्यांचा भाजपच्या राज्य कार्यकारीणी बैठकांतील वावर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी वाढलेला संवाद भविष्यासाठी काहीसा सुखद वाटत आहे. त्यातच काल (गुरुवारी) त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.

मागच्या अडीच वर्षांत राज्यसभा, विधान परिषद आणि परवाच्या मंत्रीमंडळ विस्तारात नावाची चर्चा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. आता पुन्हा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. आता तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळेल का, असा प्रश्न आणि संधी मिळेलच असा त्यांच्या समर्थकांना विश्वास वाटत आहे. याच दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. सत्तेचा प्रसाद त्यांना मिळेल का हे पाहावे लागेल.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभावनंतर पंकजा मुंडे यांचा त्यांच्या जिल्ह्याचे होमपिच असलेल्या बीड जिल्ह्यातील वावर मर्यादीतच आढळत आहे. सुरुवातीच्या काळातच कोरोना विषाणू संसर्गामुळे मर्यादा होत्या. नंतर अनेक नैसर्गीक आपत्तींसह इतर कोणत्याही संकटात त्या धडाडीने धाऊन आल्याचे, तत्कालिन आघाडी सरकारच्या विरोधात जिल्ह्यात मोठे आंदोलन केल्याचे उदाहरण नाही. त्यांच्याकडे मध्यप्रदेश सहप्रभारी पदाची जबाबदारी आहे.

दरम्यान, या कालावधीत विधान परिषद, राज्यसभांच्या वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आले असले तरी त्यांच्यापेक्षा अनेक दुय्यम लोकांना संधी मिळाली. त्यामुळे मुंडे समर्थकांनी थेट नाराजीही व्यक्त केली. मागच्या महायुती सरकारच्या काळापासून देवेंद्र फडणवीस त्यांचे संबंध तेवढे चांगले नसल्याचे उघड असल्यानेच त्यांची संधी वारंवार टळली हे वास्तव आहे. मात्र, आमच्यात काहीही दुरावा-अंतर नाही असे दोघांकडून सांगीतले जाणे हे तेवढेच वरकरणी आहे.

मुंडे यांनी काल फडणवीसांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस नसले तरी पंकजा मुंडे व अमृता फडणवीस यांच्यात संवाद झाला. आता मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे हे निश्चित आहे. आताच्या मंत्रीमंडळात एकही महिला नाही. भविष्यातील विस्तारात महिलेचा सहभाग होईल हे निश्चित आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना प्रसादरुपी सत्तेत संधी मिळेल, का लवकरत समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT